Type Here to Get Search Results !

उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; मृतांचा आकडा स्पष्ट नाही



उल्हासनगर (भानुदास गायकवाड)

उल्हासनगरमधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. उल्हासनगर येथील सेच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.  


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे. उल्हानगर शहरात सेच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीच्या CS2 डिपार्टमेंटमध्ये शनिवारी १२ वाजेच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की शहरातील तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर, परिसरातील घरांना हादरे बसले. 


या भीषण स्फोट आतापर्यंत २ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळाताच स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ऐन गणेशोत्सवात कामगारांवर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies