Type Here to Get Search Results !

पाकिस्तानी गुप्तहेराला अटक, बरीच गुप्त माहिती आली समोर



कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी एका कथित पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली आहे.या संशयित पाकिस्तानी गुप्तहेराकडून कागदपत्रेही जप्त करण्यात आलीये. कोलकाता पोलिसांनी आरोपीला त्याच्या हावडा येथील घरातून पकडले. पश्चिम बंगालच्या एसटीएफने अनेक तासांच्या चौकशीनंतर आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी देशाच्या सुरक्षेला बाधक कारवायांमध्ये थेट सहभागी असल्याचे आढळून आले आहे. आरोपीच्या मोबाइलवरून फोटो, व्हिडिओ आणि ऑनलाइन चॅट्सच्या स्वरूपात गुप्त माहिती जप्त करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad