Type Here to Get Search Results !

आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक कुंदन टोकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पालघर या जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये पदाधिकारी च्या नियुक्ती.




जव्हार :- सोमनाथ टोकरे 



 -गुरुवार, दि -६/७/२०२३ रोजी आर्यन आदिवासी फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे वाडा विश्राम गृह येथे आपली आदिवासी परंपरा कशी टिकवावी या हेतूने येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाबद्दल नियोजन करण्यासाठी वाडा तालुका स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यानिमित्त ठाणे ,पालघर जिल्ह्यात पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. येणाऱ्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने नियोजन करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.




आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची वारसा घेऊन आदिवासींचे महापुरुष आदिवासींची संस्कृती रूढी,परंपरा, आपले विविध पथनाट्य, तारपा नृत्य, ढोल नाच, तूर नाच,असे इतरही जास्तीत जास्त आदिवासींची संस्कृती जपत पथनाट्य करायची आहेत. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन निमित्ताने सर्व आदिवासींनी मोठ्या संख्येने तरुण , महिला, जेष्ठ नागरिक विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आर्यन फाऊंडेशनचे संस्थापक कुंदन टोकरे यांनी आदिवासी समाजाला कार्यक्रम दरम्यान संस्थापक कुंदन टोकरे आव्हान केले आहे. कार्यक्रम दरम्यान निमित्ताने उपस्थित संदीप धर्मा भुजारे पालघर जिल्हा अध्यक्ष पदी अविनाश गजानन शिंदे वाडा तालुका अध्यक्ष पदी छगन सुभाष टोकरे (वाडा तालुका उपाध्यक्ष पदी राजू अनिल माने भिवंडी तालुका अध्यक्ष पदी .रोहित भरत भोईर भिवंडी तालुका सचिव पदी मिथुन चंदर मुकणे भिवंडी तालुका उपाध्यक्ष पदी या नियुक्त्या करण्यात आली. यावेळी उपस्थित आर्यन आदिवासी फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष कुंदन भाऊ टोकरे साहेब, सचिव श्री संदिप महाकाल साहेब, सरचिटणीस -किरण लाखात, सदस्य कुणाल टोकरे,तेजस न्हानवे, रवी घाटाळ, हरी बरतड, अनिल आंबात, आकाश बसवत इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पदे नियुक्ती करण्यात आली . तसेच ठाणे पालघर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad