Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद शाळा कोचाळे, येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.

जिल्हा परिषद शाळा कोचाळे, येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात संपन्न.


मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी


 पालघर जिल्यातील आज सर्व ठिकाणी शालापूर्व मेळावा आयोजित करण्यात आले असून त्यापैकी अतिदुर्गम असलेली जिल्हा परिषद शाळा कोचाळे या ठिकाणी सुध्या आज दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी रांगोळी फुग्यानी छान शाळा सजवून लेझिम च्या तालावर दाखलपात्र विद्यार्थ्यांची गावभर मिरवणूक काढण्यात आली . शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर गावच्या सरपंच हनुमंत फसाळे यांनी सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले . विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रत्यक्ष मेळाव्यास सुरुवात झाली . शाळापूर्व तयारी मेलाव्या निमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर चे विषय सहाय्यक श्री. तानाजी डावरे सर यांनी सुरुवाती पासून तर शेवटपर्यंत मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून माता पालक गटांना मार्गदर्शन केले . माता पालक गटाची सभा घेवून श्री. डावरे सरांनी माता पालकांचे मनोगत , समस्या अपेक्षा जाणून घेतल्या . मेळाव्यास वाकडपाडा बिटाचे बीट विस्तार अधिकारी मा. नंदकुमार वाघ , किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख मा. वीरकर साहेब व मोठ्या प्रमाणात माता पालक पालक ,ग्रामस्थ, उपस्थित होते . मेळाव्याची तायारी मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह शिक्षक राजाराम जोशी, गणेश वाघ व दिनेश ठोमरे यांनी उत्तम प्रकारे केली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad