Type Here to Get Search Results !

मोहोळ | इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले



मोहोळ : इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले


मोहोळ तालुक्यातील एका गावातून मोहोळ शहरात इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ शहरातील एका विद्यालयात ही मुलगी आली होती. इयत्ता दहावीचा शेवटचा पेपर होता. तो पेपर दुपारी दोन वाजता संपला. मात्र, ती पीडित मुलगी आपल्या घरी गेली नाही. ती घरी का आली नाही म्हणून पीडितेच्या आई, वडिलांनी सर्वत्र चौकशी केली. मात्र, कोठेही मुलगी आढळून आली नाही. त्यानंतर कोणीतरी अज्ञाताने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad