Type Here to Get Search Results !

पंचायत समिती मोखाडा येथे गुरुवार पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा प्रदीप वाघ यांचा इशारा



पंचायत समिती मोखाडा येथे गुरुवार पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा प्रदीप वाघ यांचा इशारा



 मोखाडा प्रतिनिधी:- सौरभ कामडी 


              मोखाडा तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी दि. 9/3/2023 पासुन पंचायत समिती मोखाडा येथे प्रदीप वाघ व त्यांचे सहकारी संजय हमरे, रमेश बोटे, नरेंद्र येले, दशरथ पाटील, नंदकुमार वाघ, निलेश झुगरे, निलेश ठोमरे, भरत बुधर यासह अनेक कार्यकर्ते उपोषण करणार आहेत.

प्रमुख मागण्या 

मोखाडा तालुक्यातील कारेगाव, गोमघर, चास, इत्यादी गावांची नळपाणी पुरवठा विषयी पूर्ण करून पाणी पुरवठा सुरु करणे व संबंधित जवाबदार यंत्रणेवर कारवाई करणे.

मोखाडा तालुक्यातील सायदे (मारुतीवाडी) धरणाची दुरुस्ती काम पूर्ण करून दोषीवर कारवाई करणे, खोडाळ येथे आधार कार्ड केंद्र सुरू करणे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत जातीचे प्रमाणपत्र व इतर दाखले शाळे मध्येच वाटप करणे

आरोग्य विभागाची रिक्त पदे, सर्व वैधकीय अधिकारी (सूर्यमाळ.इत्यादी) जागा भरणे.

जलजीवन मिशन योजने मुळे खोदकाम केलेले रस्ते 

कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते पुर्ववत करणे.

कुर्लोद आरोग्य उपकेंद्र बांधकाम सुरु करणे

खोडाळ प्राथमिक केंद्रास ग्रामीण रुग्णालय दर्जा देणे

इत्यादी मागण्यांसाठी उपोषण करणार असल्याचे प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad