Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरात पुन्हा घरफोडी; 68 हजारांचा ऐवज लंपास



सोलापूर शहरात पुन्हा घरफोडी; 68 हजारांचा ऐवज लंपास


सोलापूर शहरातील वांगी रोड येथील शहा नगरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्याने नेकलेस, कानातील बाळी, झुबे, पैंजण व रोख रक्कम असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.


याबाबतची फिर्याद रोहिणी होनराव यांनी शुक्रवारी सोलापूरच्या सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना 21 ते 22 मार्च या कालावधीत घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बंद घर असल्याचे हेरून घरामागील पत्रा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील सदर ऐवज चोरून नेला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad