Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे



किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवाडी येथील शाळेवरील शिक्षिका श्रीमती पांचाळ आर . व्ही .यांची नियुक्ती सोनवडी या शाळेवर असून त्यांची प्रतिनियुक्ती दुसऱ्या ठिकाणी केल्याने ही प्रतिनियुक्ती रद्द न केल्यामुळे येथील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले सोनवाडी हे गाव आदिवासी बहुल भागात असल्याने या शाळेत तब्बल 94 विद्यार्थी शिक्षण घेत असून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे . या शाळेत उपस्थित चार शिक्षक असून श्रीमती पांचाळ आर व्ही पदवीधर असून त्यांची प्रतिनियुक्ती  बेकायदेशीरपणे केल्याने येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असून फार मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन ढोले व विनोद चव्हाण उपसरपंच , रामकिशन टारपे , भुजाजी टरपे, शिवाजी जाधव , गजानन देशमुखे , नसुरहीन शेख , केशव भिसे , साहेबराव व्यवहारे , राजकुमार टारपे , मारोती भुरके , विश्वनाथ टारपे, रामेश्वर टारपे , नागनाथ सांळुके आदी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले .गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना लेखी निवेदन देऊनही कुठलेही पाऊल उचलले नसल्याने यांच्या हलगर्जीपणामुळे  विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad