Type Here to Get Search Results !

अर्धापूर | दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू



अर्धापूर ( नांदेड ) : दुचाकी व अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पोलिस कर्मचाऱ्याचा आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास असणा पुलावर जागीच मृत्यू झाला. मनोहर मारोती पवळे ( कुरूळा ता. कंधार ) असे मृताचे नाव असून ते जिंतूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी होते. घटनास्थळी अतीरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, महामार्ग प्र.अदित्य लाकुळे, पोलीस निरीक्षक हानुमंत गायकवाड यांनी भेट दिली.जिंतूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत असलेले मनोहर मारोती पवळे ( ४२) हे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत होते. दरम्यान, असणा पुलावर दुचाकी आणि अज्ञात वाहनाची जबर धडक झाली . यात मनोहर पवळे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती कि यात दुचाकी चकनाचूर झाली.अपघातातील मयत पोलीस कर्मचारी मनोहर मारोती पवळे मुळ गाव कुरूळा ता.कंधार असुन ते सध्या नमस्कार चौक येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या दुर्देवी घटनेबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. सदर घटने प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेतले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad