Type Here to Get Search Results !

आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगाम रब्बी ,पीक हरबरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.



आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगाम रब्बी ,पीक हरबरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.


जव्हार - दिनेश आंबेकर


विक्रमगड :- विक्रमगड तालुक्यातील माडाचापाडा हे महसूल गाव म्हणून वसलेले आहे. या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या विविध योजनांचे येथील ग्रामस्थ शेतकरी लाभ घेत असतात.

           त्याचप्रमाणे या वर्षी शुद्धा येथील शेतकऱ्यांना विविध लागवडी योजनांचे लाभ भेटले आहे.

       या योजना भेटल्यावर येथील शेतकरी योग्य रीतीने लागवड करून आणि त्याचा चांगल्या प्रमाणात लाभ घेत असतात. 

          आणि अश्याचे प्रकारचे शेतकऱ्यांना मिळणारे लागवडीचे वाटप आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगामी रब्बी, पीक हरभरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.

      त्याच प्रमाणे पुढच्या वर्षी फळ लागवडीसाठी काही शेतकऱ्यांची नावे घेण्यात आली.

           हे सर्व वाटप करत असताना ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाच सदस्य श्री. रमण देवळे सर तसेच विक्रमगड तालुक्यातील कृषी सहाय्यक अधिकारी माननीय श्री. रामदास फरारा साहेब यांच्या अध्यक्षेखाली ही योजना वाटप करण्यात आली. आणि पुढील वर्षी फळ लागवडीसाठी येथील शेतकऱ्यांना काही माहिती देऊन त्याचे वाटप पुढच्या वर्षी करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad