Type Here to Get Search Results !

माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वर संचालकपदी निवड



माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वर संचालकपदी निवड


धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन वर निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनची पुणे येथे निवडणूक झाली असून त्यात प्रतिस्पर्धी उमेदवार अतुल जैन यांना अवघी दोन मते मिळाली तसेच

राजवर्धनजी कदमबांडे यांना एकूण चार मतं मिळाली व त्यांची पाच वर्षांसाठी संचालकपदी निवड झाली आहे राजवर्धन कदमबांडे यांच्या निवडीबद्दल धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे चे उपाध्यक्ष दिपक बापू पटेल, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक भरतभाई माळी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी साहेब व मुख्य कार्यालय धुळे येथील बँकेच्या अधिकारी वर्ग तर्फे तसेच सहकार बँक स्टॉप सोसायटी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी संघटना यांच्या वतीने राजवर्धनजी कदमबांडे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे व असोसिएशनच्या पुढील भावी उज्वल कारकीर्दीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies