Type Here to Get Search Results !

नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध



नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध


नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील तर उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची निवड


नंदुरबार- नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजू ऊर्फ राजाराम पाटील तर उपाध्यक्ष महादू हिरणवाळे यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या हितासाठी कार्य करण्याची ठरविण्यात आले.


नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची बैठक नेहरू नगरातील पत्रकार भवनात घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी होते. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादक व प्रतिनिधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील उर्फ राजाराम पाटील, उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे, सरचिटणीसपदी विष्णू पाटील, कोषाध्यक्ष दिनेश सोनवणे, कार्याध्यक्षपदी किसन जाधव, प्रसिद्धी प्रमुख जगदीश ठाकुर, सहकोषाध्यक्ष दीपक सोनार, सदस्यपदी सुबोध अहिरे, प्रवीण चव्हाण, दिलीप बडगुजर, शैलेंद्र ईशी यांची निवड करण्यात आली यावेळी एकजूट होऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार हंसराज चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश ठाकुर यांनी केले. मावळते अध्यक्ष सतीश गोसावी यांनी नवनियुक्त अध्यक्षांकडे पदभार सोपविला. याप्रसंगी बापू ठाकरे, सतीश गोसावी, प्रल्हाद आल्हाट, महादू हिरणवाळे, राजू पाटील, ज्ञानेश्वर गवळे, दिलीप बडगुजर, सुबोध अहिरे, किसन जाधव, दिनेश सोनवणे, राजेंद्र पवार, सुभाष राजपूत, जगदीश ठाकुर, अशोक शिरसाठ, वैभव करवंदकर, अकील पिंजारी, किशोर गवळी, शैलेंद्र ईशी, दीपक सोनार, विष्णू पाटील हंसराज चौधरी, प्रवीण चव्हाण, जितेंद्र जाधव, सुमानसिंग राजपूत, प्रशांत चौधरी, प्रेमचंद राजपूत आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad