Type Here to Get Search Results !

औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे पं.दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.



औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे पं.दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन.


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर 


  नोकरीच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ०४:०० वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.




या मेळाव्यामध्ये नोकरीच्या संधी नामांकित (उद्योग/कंपनी), कौशल्य विभागाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षणाची माहिती, स्टार्टअप व उद्योजक्तासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, राष्ट्रीय पातळीवरील रोजगाराच्या व करिअरच्या संधी व सेवा बद्दल माहिती दिली जाईल.

तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती,मुद्रा कर्ज योजना, विविध शासकीय योजना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन जाईल.

 चला प्रकल्प कार्यालय बघुया उपक्रम – प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह यांची संकल्पना

यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मधील सुशिक्षित बेरोजगार व रोजगार व कंपनीमध्ये नोकरी करण्याकरिता इच्छुक जव्हार, मोखाडा, विक्रमगड , वाडा या तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी व महिलांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.

तसेच येताना इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे सोबत घेऊन यावे. सदर रोजगार मेळावा हा सर्व सुशिक्षित बेरोजगारासाठी विविध क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधीचा लाभ मिळावा याकरिता आयोजित केला असून या शिबिराचा लाभ संपूर्ण जव्हार प्रकल्पांतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा.

आपला स्वतः बायोडाटा,

संबंधित शैक्षणिक कागदपत्रे,

जातीचा दाखला,

रहिवासी दाखला.

तसेच या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी रोजगार / महास्वयंम या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाइन नोंदणी करावी. – आयुषी सिंह, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad