Type Here to Get Search Results !

अहिल्याबाई होळकर शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ह.मंगेवाडीत ग्राम वाचनालयाचा शुभारंभ!



अहिल्याबाई होळकर शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने ह.मंगेवाडीत ग्राम वाचनालयाचा शुभारंभ!


ह.मंगेवाडी प्रतिनिधी:


 सांगोला तालुक्यातील ह. मंगेवाडी गावामध्ये अहिल्याबाई होळकर शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, बहुउद्देशीय मंडळ .याच्यावतीने गावामध्ये ग्राम वाचनालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या मंडळाचे सचिव तेजस दिलीप सुतार यांनी उद्घाटन प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना असे सांगितले की, या वाचनालयात ग्रामस्थांनी स्व- इच्छेने पुस्तक, ग्रंथ भेट देऊन हे वाचनालय ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्यांसाठी चालवायचे आहे, उद्घाटन प्रसंगी मंडळाच्या वतीने नागरिकांना नवीन वर्षाचे दिनदर्शिकाचे वाटप . शाळेतील लहान मुलांना खाऊ वाटप करून ग्राम वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित, तेजस सुतार, दिलीप सुतार, महादेव भुसनर, महादेव सुतार, राजू भुसनर, शिवाजी भुसनर, नाना मोरे, बंडु भुसनर, कैलास जाधव, सागर पाटील, शिवाजी कलगुंडे, भारत भुसनर, आशा मॅडम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad