Type Here to Get Search Results !

कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना – भाजपाचा झेंडा



कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी संघटना – भाजपाचा झेंडा


● निमणी येथे काही सदस्य यापूर्वीच अविरोध आले होते  




चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. त्यात शेतकरी संघटना – भाजपा युतीची सरशी झाली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रथमच सरपंचपद कवटाळा ग्रामपंचायत मध्ये प्राप्त झाले असून काँगेस निराशा पदरी पडली आहे.



तालुक्यातील बाखर्डी, अंतरगाव बु., वीरूर गाडेगाव, निमनी, कुकुडसाथ, माथा, यरगव्हाण, जेवरा, कोळसी बु., कवटाळा येथील सरपंच व सदस्य पदाची निवडणूक पार पडली.


‌बाखर्डी येथे सरपंचपदी संघटनेचे अरुण रागीट, अंतरगाव येथे संघटनेचे नीता वाघमारे, माथा येथे संघटना- भाजपाच्या मंजुषा देवाळकर, विरूर गाडेगावच्या भाजपाच्या तेजस्विना मनोहर झाडे, कवठाळा येथे महाविकास आघाडीच्या रुपाली बोबडे, कुंकूडसाथ भाजपा- संघटना युतीचे शंकर आत्राम, जेवरा भाजपाचे नैनेश आत्राम, कोडशी बु. येथे संघटना-भाजपाचे उमेश कोल्हे, येरगव्हाण येथे काँग्रेसच्या प्रेमीला किन्नाके, निमणी येथे भाजपा- संघटनेचे अतुल धोटे विजयी झाले आहे.

‌येरगाव्हण, गांधीनगर, निमणी येथे काही सदस्य यापूर्वीच अविरोध निवडून आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad