Type Here to Get Search Results !

शनिमांडळ येथील शनि मंदिराच्या कळसाला सुवर्ण मुलामासाठी योगदानाचे आवाहन



शनिमांडळ येथील शनि मंदिराच्या कळसाला सुवर्ण मुलामासाठी योगदानाचे आवाहन




नंदुरबार । तालुक्यातील शनिमांडळ येथे शनि महाराजांचे भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच या मंदिराच्या कळसासाठी माहेरवासिनीनी ४०० ग्रॅम सुवर्ण लेप लावण्याचा मानस केला आहे. यासाठी माहेरवासीनी व दात्यांकडून आत्तापर्यंत ३०० ग्रॅम सोने दान आले आहे. अद्यापही १०० ग्रॅम सोने बाकी असून त्यासाठी शनैश्वर मंदिर ट्रस्ट व माहेरवासिनींकडून इच्छूक दात्यांना मंदिराच्या कळसाला सुवर्ण मुलामासाठी योगदानाचे आवाहन करण्यात आले आहे.




नंदुरबार शहरापासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या शनिमांडळ येथील शनि देवाचे साडेसाती मुक्त ठिकाण म्हणून एक शनि महाराजांच्या मंदिरावर भाविकांची दर्शनासाठी नेहमीच वर्दळ असते तसेच या मंदिरावर वर्षातून येणाऱ्या शनी अमावस्येला यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून भाविक दर्शनासाठी व नवस्फूर्तीसाठी येतात. शनि महाराजांचे मंदिर पर्यटन विकास व लोकवर्गणीच्या माध्यमातून भव्य- दिव्य साकारण्यात येत आहे. या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शनेश्वर ट्रस्ट ट्रस्टच्या वतीने दात्यांना देणगीसाठी आवाहन करण्यात येत आहे. शनैश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात करण्यात येणार असल्याची ही माहिती ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad