Type Here to Get Search Results !

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील खो-खो स्पर्धत,पुणे उस्मानाबाद संघ प्रथम



खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथील खो-खो स्पर्धत,पुणे उस्मानाबाद संघ प्रथम


 मोहोळ प्रतिनिधी :

देशाचे नेते, मा.शरचंद्र पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरुष/महिला खो-खो निमित्त दिनांक 12 डिसेंबर रोजी सुरु झालेल्या खो - खो स्पर्धेचा फायनल सामना काल झाला.

मोहोळ येथे राष्ट्रीय नेते खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82व्या वाढदिवसानिमित्त आमदार यशवंत तात्या माने व मा.अजिंक्यराणा पाटील यांच्या आयोजनातून भव्य राज्यस्तरीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धाच्या अंतिम(फायनल)सामना माजी आमदार राजनजी पाटील,आमदार यशवंत(तात्या)माने,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


  यामध्ये १) मुलामध्ये प्रथम क्रमांक नव महाराष्ट्र संघ पुणे व मुलीमध्ये छत्रपती संघ उस्मानाबाद यांनी पटकविला तर २) व्दितीय क्रमांक मुलामध्ये शिरसेकड,मुंबई उपनगर,तर मुलीमध्ये रा.फ.नाईक ठाणे,तसेच ३) तृतीय* क्रमांक मुलामध्ये विहंग संघ ठाणे, व मुलीमध्ये राजामाता संघ पुणे यांनी पटकविला.


 यावेळी मोहोळ राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद,ज्योत्स्ना पाटील,

 कादे,रामदास चवरे,वैभव गुंड,प्रमोद डोके,कुंदन धोत्रे,दत्ता खवळे,राजू सुतार,शकील शेख,अतुल गावडे,नागेश भोसले,अमोल कादे,संतोष मते,जयवंत गुंड मुकेश बचुटे, सह पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच खो खो असोसिएशनचे पदाधिकारी,पंच,खेळाडू,पत्रकार बंधू उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad