Type Here to Get Search Results !

विठ्ठलराव शिंदे स सा का व ऊस उद्दिष्ट शंभर प्लस शेतकरी मंच यांच्यावतीने शिवर फेरी व आदर्श ऊस प्लॉट पाहण्याचे आयोजन





विठ्ठलराव शिंदे स सा का व ऊस उद्दिष्ट शंभर प्लस शेतकरी मंच यांच्यावतीने शिवर फेरी व आदर्श ऊस प्लॉट पाहण्याचे आयोजन

बबन दादा शिंदे व रणजीत भैया शिंदे यांच्या प्रेरणेतून एकरी 100 टन प्लस ऊस उत्पादन काढलेल्या व 100 टन टार्गेट असलेल्या प्रगतशील शेतकऱ्यांची निवड करून त्या प्लॉट पाहण्यासाठी शिवरफेरीचे आयोजन करण्यात आले होते 



या शिवार फेरीमध्ये निमगाव टें येथे विठ्ठल राव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री. थीटे साहेब यांनी शेतकऱ्यांना शेणखत कंपोस्ट खत व राख याची भट्टी लावून शेतामध्ये कसे वापरावे हुमणी या रोगावरती कसे नियंत्रण मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले.


तसेच परीते येते विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतीअधिकारी श्री सुनील बंडगर यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले


यावेळी परिते येथील प्रगतशील शेतकरी बाबर भारत कोंडीबा यांनी एकरी 120 टन 265 या वरायटीमध्ये उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला


या शिवाय फेरीमध्ये प्रगतशील शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी, गांडूळ खत प्रकल्प राबविणारे शेतकरी, तसेच सुपरकेन नर्सरी करणारे शेतकऱ्यांची शिवार फेरीमध्ये निवड करण्यात आली होती


 व बेंबळे येथे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ भास्कर हुलगे यांच्या 125 टन टार्गेट उसाच्या प्लॉटची पाहणी करून शिवर फेरीच्या कार्यक्रमाची सांगता झाली.



हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सर्व स्टाफ व ऊस विकासाधिकारी श्री नारायण लगड साहेब व कृषी भूषण पुरस्कार प्राप्त श्री सोमनाथ भास्कर हुलगे यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad