Type Here to Get Search Results !

नंदुरबार | ७ मोटारसायकली जप्त टोळीतील दोघांना अटक



७ मोटारसायकली जप्त टोळीतील दोघांना अटक


नंदुरबार - मोटार सायकल चोरी करणारे २ संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ लाख ६५ हजार रुपये किमंतीच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध

पोलीस ठाणे हद्दीतुन मोठ्या प्रमाणात मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल असुन बरेचसे गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नाहीत. त्यामुळे पोलीसांसमोर चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad