Type Here to Get Search Results !

आ. माधवराव पाटील जवळगाव कर यांनी केले भालेराव कुटुंबियांचे सांत्वन





आ. माधवराव पाटील जवळगाव कर यांनी केले भालेराव कुटुंबियांचे सांत्वन: 

 हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: एम. यू. हनवते हिमायतनगर येथील( एम .एस. ई .बी) मधील सेवा निवृत्त कर्मचारी का. रामराव गंगाराम भालेराव यांचे वयाच्या 70 व्या वर्षी औरंगाबाद येथील `कमल नयन बजाज हॉस्पिटल´ मध्ये उपचार घेत असतांना दि.25 /09/22 रोजी निधन झाले दि.26 /09 /22 वार सोमवार रोजी त्यांच्यावर नालंदा बुद्धविहार जवळील बौद्ध स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.भालेराव कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर कळताच हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्वरित घरी आप्तस्वकीयांची भेट घेऊन सांत्वन केले व त्यांचा मुलगा अशोक भालेराव यांच्या सोबत विचार पूस केली.त्यांच्या सोबत उपस्थित काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सुभाष अल्ला राठोड, दिलीप अल्ला राठोड ,ज्ञानेश्वर भाऊ शिंदे ,संजय भाऊ माने ,अब्दुल बाकीभाई, योगेश भाऊ चिल्कावर इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad