Type Here to Get Search Results !

फुलसांवगी येथे भाविक भक्तांची मांदियाळी भक्तांची ▪️मनोकामना सिद्ध करणारा पुणेश्वर भगवान




फुलसांवगी येथे भाविक भक्तांची मांदियाळी भक्तांची
▪️मनोकामना सिद्ध करणारा पुणेश्वर भगवान

 माहागाव प्रतिनिधी:-  संजय जाधव
श्रावण महिना शिव आराधनेचा महिना म्हणून ओळखल्या जातो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त पुणेश्वर मंदिरात दर्शनाकरिता रीघ लावतात.अशातच  महागाव तालुक्यातील असलेल्या हेमांड पणती बांधकाम असलेल्या पूणेश्वर भगवान फुलसावंगी ते किनवट  महामार्ग मार्गावरील फुलसावंगी  येथे आहे पुणेश्वर (महादेव) मंदिरात भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्याकरिता पुणेश्वर भगवानाला बेलपत्री वाहून साकडे
घालतात.पैनगंगेच्या तीरावरती पुणेश्वर भगवान यांचं प्राचीन कालीन मदींर आहे फुलसावंगी येथे एका उंच टेकडीवर मंदिर आहे.या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्याप्रमाणत पुणेश्वर भगवानांच्या दर्शनाकरिता रीघ लागलेली असते.पुणेश्वर भगवान  दर्शनाकरिता भाविक दूरवरून येत असतात.या मार्गाने जाणारे वाहनधारक, प्रवासी पुणेश्वर भगवान यांचं दर्शन घेऊनच पुढील प्रवास करतात.श्रावण महिन्यात
या मंदीरावर महाप्रसाद व भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मंदीराला लागूनच पैनगंगा नंदी चे भव्य दिव्य पात्र जाते.मंदिराचा जिणोद्धार करण्यासाठी शासनाने निधी न दिल्याने गावकर्यांच्या व परिसरातील जनतेच्या सहकार्याने सध्या मंदिराचा जिर्णोधार सुरू आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याकरिता सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत पर्यटन स्थळातून निधी देणे महत्त्वाचे आहे. खा. हेमंत पाटील व आ. नामदेव ससाने यांनी मंदिराच्या जिर्णोध्दाराकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी भक्ताची मागणी आहे. मंदिर परिसर  पर्यटन स्थळ असल्याने येथे  शिवशोभीकरणाची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad