Type Here to Get Search Results !

महागाव | काळी टेभीं येथे नाल्याच्या पुरात महिला गेली वाहून




काळी टेभीं येथे नाल्याच्या पुरात महिला गेली वाहून

फुलसावंगी/प्रतिनिधी : - संजय जाधव

महागाव तालुक्यातील काळी टेंभी परिसरात ढग फुटी स्वरूपाच्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे बैल गाडी,एक पुरूष,दोन महिला वाहून गेले होते.त्यामधील पुरूष व एक महिलेला वाचविण्यात आले.एका महिलेचा शोध घेणे सुरू आहे.




आज काळी टेंभी परिसरात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात गेलेले शेतकरी मारोती बळीराम पवार ६० वर्षे व त्याची पत्नी कमलाबाई मारोती पवार वय वर्षे ५५ मरगु जाधव हे तिघे पावसाचे प्रमाण वाढत असल्याने शेतातील काम अर्धवट सोडून बैलबंडीने आपल्या गावाकडे येत असताना रस्त्यावरील नाल्यातून येत असताना अचानक आलेल्या पुरात बैलबंडीसोबत तिघेही वाहून गेले होते परंतु सुदैवाने मारोती जाधव व मरगु जाधव यांना पुरातून वाचविण्यात आले.

परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कमलाबाई जाधव ह्या पाण्याच्या प्रवाहात दुरवर वाहून गेल्याने त्यांचा शोध लागु शकला नव्हता. घटनास्थळी महागाव येथील तहसीलदार विशंभर राणे साहेब नायब तहसीलदार तलाठी पोलीस पाटील हजर होते अशा अचानक घडलेल्या घटनेने काळी सह परिसरातील शेतकरी शेतमजुरांमध्ये चिंतेसह भिती चे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वाहून गेलेल्या महिलेचा शोध मोहीम सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad