Type Here to Get Search Results !

कोरपना येथे आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन साजरा




कोरपना येथे आश्रम शाळेत जागतिक आदिवासी दिन साजरा

स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक/ माध्यमिक आश्रम शाळा तथा स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथे जागतिक आदिवासी दिन/क्रांती दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेपासून तर शेडमाके चौक पर्यंत भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये आदिवासी पारंपारिक नृत्य , आदिवासी क्रांतिकारक, भारत माता , व थोर विचारवंताच्या वेशभूषा धारण करून विद्यार्थी सहभागी झाले होते ,त्यात बिरसा मुंडा, बापूराव शेडमाके, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, राणी दुर्गावती ,तसेच भारत माता ची भूमिकेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच शाळेमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव खडसे होते,प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षक दादाजी आडकिने . प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा प्रदीप गेडाम , प्रदीप जाधव , निला धुपे होत्या कार्यक्रमाचे संचालन, प्रा श्री कृष्णा उपलचीवार यांनी केले, कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रा. अनुप रणदिवे विठ्ठल सोनेकर , अधीक्षक कांबळे , दिनकर अवताडे , प्राथमिक शिक्षक व सर्व शाळेतील शिक्षक , कर्मचारी,व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad