Type Here to Get Search Results !

हिंगोली | शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच मुबंईत शक्ती प्रदर्शन





हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी सह्याद्री अतिथी गृहाचा परिसर गेला दणाणून.




आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह व समर्थकांसह मुंबई येथे जाऊन राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे जंगी सत्कार केला.




      यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आमदार संतोष बांगर हे माझ्या समर्थनार्थ आले, मी प्रत्येक वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असून तुमच्या हिंगोली जिल्ह्याच्या विकासाकरिता काहीही कमी पडू देणार नाही तसेच संतोष बांगर जिल्हाप्रमुख आहेत,




 त्यांच्यासारखा 24 तास जनसेवा करणारा आमदार तुम्हाला लाभला आहे हे तुमचं भाग्य आहे आणि मी मुख्यमंत्री नसून तुम्ही प्रत्येक जण या राज्याचे मुख्यमंत्रीच आहात असेही यावेळी बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले यावेळी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", "मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" च्या घोषणांनी सह्याद्री अतिथी गृहाचा परिसर दणाणून गेला.







          यावेळी बोलताना आमदार बांगर म्हणाले की माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असून ते एक मास लीडर आहेत आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेते आहेत अशा शब्दात आमदार बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.


          यावेळी अनेक आमदार महोदय तसेच हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व आमदार संतोष बांगर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad