Type Here to Get Search Results !

केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीचा) गैरवापर करीत असल्याच्या विरोधात कोरपना काॅंग्रेसच्या वतीने शांततापूर्ण सत्याग्रह




केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीचा) गैरवापर करीत असल्याच्या विरोधात कोरपना काॅंग्रेसच्या वतीने शांततापूर्ण सत्याग्रह

कोरपना प्रतीनीधी मनोज गोरे




केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सुडबुध्दीने मा. काॅंग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांना लक्ष करीत असल्याचे आज संपूर्ण देश पाहत आहे. भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी काॅंग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे. हे हुकुमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे.






       या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी कोरपना काॅंग्रेसच्या वतीने शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन २६ जूलै रोजी, कोरपना शहरातील बसस्थानक चौक येथे करण्यात आले होते. यावेळी राजुरा विधानसभा आमदार
मा. सुभाष भाऊ धोटे यांच्या नेतृत्व तालुका अध्यक्ष विठ्ठलराव थीपे सर विजय बावणे संचालक उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद श्याम रणदिवे माजी सभापती संभाजी पा कोवे माजी उपसभापती सीताराम कोडापे माजी सदस्य जिल्हा परिषद सुरेश पा मालेकार इसमाईल भाई उपाध्यक्ष नगर पंचायत मनोहर चणे नगर सेवक निसार भाई नगर सेवक गणेश गोडे माजी अध्यक्ष युवक काँग्रेस घनशाम नांदेकर माजी अध्यक्ष युवक काँग्रेस अनिल गोंडे उपसरपंच संजय जाधव उपसरपंच यांसह काॅंग्रेस पक्षाचे अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad