Type Here to Get Search Results !

पुर्णे सरांनी सातत्याने न्यायालयीन संघर्ष करून शेवटी त्यांना न्याय मिळाला न्यायालयीन लढाईत श्री पुर्णे यांना यश

न्यायालयीन लढाईत श्री पुर्णे यांना यश....





         श्री भगवान पुर्णे तथा प्राचार्य बी एस पुर्णे यांनी सन 1985-87 या कालावधीत मॉडर्न इंग्लिश स्कूल, वसमत येथे प्रथमतः सह शिक्षक म्हणून काम केले होते. तद्नंतर ते बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ बाराशिव ता वसमत जि हिंगोली या संस्थेत मु. अ. तथा प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. 

     श्री बी एस पुर्णे हे यशोदीप शिक्षण संस्था माळसोन्ना ता जि परभणी चे संस्थापक सचिव आहेत. या संस्थेची मा. स. धर्मादाय आयुक्त, परभणी कार्यालयात श्री बी एस पुर्णे यांनीच नोंदणी केली आहे. या संस्थेचे

 

1) नागनाथ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय औंढा नागनाथ जि हिंगोली

 

2) नागनाथ शारीरिक शिक्षण महाविद्यालय जवळाबाजार ता औंढा नागनाथ

 

3) सरस्वती प्रथमीक विद्यालय जवळाबाजार

 

4) छत्रपती महाविद्यालय जवळाबाजार

 

5) सरस्वती स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय जवळाबाजार हे शैक्षणिक कार्य सुरू आहे.

 

या संस्थेत प्राचार्य श्री के एस शिंदे सरांना व त्यांच्या म्हणण्यानुसार स्वर्गीय सखारामजी बेगाजी बागल सर, प्रा. श्रीमान सुरेशराव जाधव सर, श्रीमान बाबुराव पवार सर आणि लोकमत देनिकाचे माजी प्रतिनिधी तथा कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते श्रीमान मुरलीधर एस. मुळे यांना सरळ कार्यकारिणी सदस्य म्हणून घेतले होते. यामुळे यशोदीप शिक्षण संस्था माळसोन्ना च्या कार्यकारिणी मध्ये श्री शिंदे सर व त्यांच्या मित्रांचे बहुमत झाले होते. म्हणून ते बी एस पुर्णे यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नव्हते.

 

म्हणून त्यांच्या मधे मत भेद निर्माण झाले होते. त्यांनी सन 2010 मध्ये श्री पुर्णे यांच्या कडे सन 2008 मध्ये सर्व नियमांची पायमल्ली करून फक्त कागदोपत्री निवडणूक घेतल्याचे अभिलेख (सुचना व ठराव) तयार केलेले पुर्णे यांच्या स्वाक्षऱ्या साठी पाठवले होते. परंतु पुर्णे यांनी त्यास नकार दिला. तेंव्हा ते सर्वजण चिडून जाऊन पुर्णे हे आपल्या बाराशिव संस्थेत कर्मचारी आहेत आणि आपण त्याला नोकरीतून काढून टाकायचे.

 

असा निर्णय घेतला व पुर्णे चे सहकारी परंतु त्यांचे नातेवाईक व काही संस्था चालक यांना हाताशी धरून पुर्णे यांना वकीलाचा सल्ला घेऊन, कायदेशीर चौकशी करुन सेवेतून कमी केले होते. 

 

        श्री बी एस पुर्णे सरांना महाराष्ट्र शासनाने सन 2008-09 चा *आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार* जाहीर करुन *दिनांक 05. 09.2009* रोजी *रोख रक्कम, शाल श्रीफळासह सपत्नीक सन्मानित* केले होते. सरांच्या चौकशी समिती मध्ये परभणी येथील बालविद्या मंदिर शाळेचे *राज्य पुरस्कार* प्राप्त माजी मुख्याध्यापक *श्रीमान वि. म. औंढेकर सर* आणि त्याच शाळेतील सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक *श्रीमान ए. पी. कुलकर्णी* सरांची लेखनीक म्हणून नियुक्ती केली होती. या चौकशी समितीतील दोन्हीही सदस्यांना एकाच वेळी काही कारणाने त्यांच्या संस्थेने *स्वेच्छा निवृत्ती* घेण्यासाठी भाग पाडले होते. चौकशी च्या वेळी पुर्णे सरांनी पुरावे दाखवून देखील पूर्वग्रह दुषीत असल्या प्रमाणे चौकशी समितीने पुर्णे सरांना दोषी ठरवून सेवेतून कमी करण्यासाठी शिफारस केली होती. या आधारेच संस्थेने कमी केले होते. 
       
श्री पुर्णे सरांनी सातत्याने न्यायालयीन संघर्ष करून शेवटी त्यांना न्याय मिळाला हे ऐकून मनस्वी आनंद झाला. एक निलंबित/बडतर्फ कर्मचारी जेव्हा एखादी न्यायालयीन लढाई जिंकतो, तेव्हा तो निकाल इतर अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक असतो. दरम्यानच्या कालावधीत आपण आपली मानसिक स्थिती अढळ ठेऊन जो संघर्ष केला त्याबद्दल आणि शेवटी संस्थेच्या विरोधात जी न्यायालयीन लढाई जिंकलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन!!! 
 असो. शेवटी आपण जिंकलात यात सर्व काही आले म्हणून आपले पुनश्च अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!!


        पी. एस. घाडगे
(अध्यक्ष, मराठवाडा शिक्षक संघ)
          व्ही. जी. पवार
(सरचिटणीस, मराठवाडा शिक्षक संघ तथा
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ) आणि इतर पदाधिकारी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad