Type Here to Get Search Results !

शुल्लक कारणावरून पतीचा पत्नीवर कुर्‍हाडीने सपासप वार

शुल्लक कारणावरून पतीचा पत्नीवर कुर्‍हाडीने सपासप वार
                   चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

गोंडपिपरी तालुकयातील भंगाराम तळोधी येथे पतीने विद्युत प्रवाहाच्या साह्याने पत्नीला ठार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला त्यामुळे संतापलेल्या पतीने कुर्‍हाडीने वार करून पत्नीची हत्या केली 
त्यानंतर पतीने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे रात्री दीडच्या सुमारास घडली यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे
गोंडपिपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे आरोपी राजू बावणे 42 ती आपली पत्नी योगिता सोबत राहतो शनिवारी रात्री दिडच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर वादाचे रूपांतर हस्ते झाले आरोपी राजूने सुरुवातीला विद्युत शॉक देऊन तिला ठार करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला त्यानंतर त्याने योगिता ला कुर्‍हाडीने वार केला यामध्ये ती जागीच ठार झाली
त्यानंतर त्याने स्वतःला संपविण्याचा देखील प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला स्थानिक घटनेची माहिती पोलिसांना मिळताच गोंडपिपरी चे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर बुद्ध आणि आरोपीला ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले आरोपी राजू बावणे यांच्याविरुद्ध 302 आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे याबद्दल 309 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत
 *घरगुती आणि किरकोळ* वादामुळेच हत्या झालेली आहे पुढील तपास सुरू आहे
गोंडपिपरी ठाणेदार 
जीवन राजगुरू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies