Type Here to Get Search Results !

जांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर माने बिनविरोध

                                जांबुड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महावीर माने बिनविरोध  
                                             नारायण पाटील गटाचे पुन्हा वर्चस्व
जांबुड प्रतिनिधी :- विनोद धुमाळ                                 ता.माळशिरस येथील नारायण पाटील गटाचे विद्यमान उपसरपंच प्रकाश कुळमकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदावरती निवडणूक लागली होती या
 निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य महावीर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व त्यांना पुरक म्हणून ग्रा.पं सदस्या सौ बाळाबाई धुमाळ यांनी अर्ज दाखल केला होता.विरोधकांचा उमेदवारी अर्ज नसल्याने आणि बाळाबाई धुमाळ यांनी आपला पुरवणी अर्ज माघार घेतल्याने  निवडणूक निर्णायक अधिकारी मुंडफणे यांनी निवडीचे अध्यक्ष सरपंच अविनाश खरात यांच्या अध्यक्षतेखाली महावीर माने यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली 
निवडी नंतर कार्यकर्त्यांनी हालगीच्या कडकडाटासह फटाक्यांची आतिषबाजी केली आणि सगळा परिसरात दनाणुन गेला होता तसेच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करुन आपला आनंद उत्सव साजरा केला         यावेळी उपस्थित  जांबुड  ग्रामपंचायतचे गट नेते व माजी उपसरपंच नारायण पाटील, ग्रामसेवक पवार मॅडम, सरपंच अविनाश खरात, जांबुड ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुळमकर, सोनाबाई चंदनशिवे,  राजकुमार बाबर, सुप्रिया नाईकनवरे, उषाताई थोरात, बाळाबाई धुमाळ, जेष्ठ नेते नागनाथ कचरे , मुरलीधर कचरे, विलास जयवंत केचे, रविराज बनसोडे, प्रदिप नाईकनवरे, गणेश ननवरे, शिवाजी कचरे, सिताराम पाटील , नितीन पिसाळ, नितीन नाईकनवरे, समाधान नाईकनवरे, रामभाऊ नाईकनवरे, अभिषेक भोसले,दादा शेख, सुनील धुमाळ, पोपट व्हरगळ, दिलीप गुळमकर तुकाराम व्हरगळ, हनुमंत कचरे,सतिश भुसनर,संजय भुसनर,मोहन नाईकनरे, हिंदुराव वाघमारे, अंकुश धुमाळ,आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad