Type Here to Get Search Results !

लहान मुलांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन

*लहान मुलांनी साजरा केला स्वातंत्र्य दिन*
देहूरोड ता 15 ऑगस्ट- चिमुकल्यांच्या  देश प्रेमाने नागरिकांना दिला देशभक्तीचा धडा. दरवर्षी शाळेमध्ये ध्वजारोहण व विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला असतो. पण कोरोना प्रादुर्भावामुळे स्वातंत्र्य दिन साध्या पध्दतीने साजरा झाला. प्रत्येकाच्या शाळेतील साजरा होणारा स्वातंत्र्य दिन आपण राहतो त्या ठिकाणी साजरा करावा हा  हेतूने घेऊन जागृत मित्र मंडळ, समर्थ कॉलनी, विकासनगर, किवळे येथील लहान मुलांनी या दिनाचे संपूर्ण नियोजन करीत 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. 
महिलांचा सन्मान करीत आई, आजी, आत्या, काकू, दीदी, ताई यांना एकत्रित करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यामुळे महिला भारावून गेल्या. साठविलेल्या पॉकेट मनीतून या मुलांनी फुगे, झेंडे, बिल्ले आणि खाऊ आदी आणून.  ध्वजारोहण ठिकाणी आकर्षक सजावट करीत देशप्रती आपले पणाची भावना प्रकट केली तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण करीत रहिवाश्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लहानग्यांनी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करीत नागरीक भारावून गेले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad