Type Here to Get Search Results !

लवंगी, ता. दक्षिण सोलापूर येथे भीमा नदीत वाहून गेलेल्या लहान मुलांच्या कुटुंबियांची भेट घेवून आमदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन.

लवंगी, ता. दक्षिण सोलापूर येथे भीमा नदीत वाहून गेलेल्या लहान मुलांच्या कुटुंबियांची भेट घेवून आमदार प्रणिती शिंदे यांनी केले सांत्वन.

सोलापूर : दि. 29 मे 2021
रोजी लवंगी येथील भीमा नदीपात्रात पोहायला गेलेल्या तीन मुली व एक मुलगा असे चार जण वाहून गेल्याचे दुर्दैवी घटना घडली. यामध्ये लवंगीचे शिवानंद पारशेट्टी यांची मुलगी कु. आरती पारशेट्टी व मुलगा चि. विठ्ठल पारशेट्टी हे वाहून गेले. तसेच शिवानंद पारशेट्टी यांची बहिण सुमित्रा तानवडे यांच्या दोन्ही मुलगी कु. आर्पिता व कु. समिक्षा या देखील पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेले. त्यामुळे संपूर्ण लवंगी परिसरात शोककळा पसरली आहे. त्याअनुषंगाने आज आमदार प्रणिती शिंदे यांनी लवंगी ता. दक्षिण सोलापूर येथे जावून पारशेट्टी व तानवडे कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबियांना महाराष्ट्र शासनाच्या मा. मुख्यमंत्री निधीमधून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच कुटुंबातील इतर लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली. यावेळेस दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस तर्फे 11,000 रुपयांची आर्थिक मदत सदर कुटुंबियांना देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies