Type Here to Get Search Results !

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पाण्याने भरलेल्या बादलीत पडून चिमुकल्याचा  दुर्दैवी मृत्यू 

भिवंडी शहरातील देव नगर परिसरात एक दुर्दैवी घडली आहे कुटुंबातील सर्व सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉल मध्ये बसले असता घरातील 1 वर्षाचा चिमुकला खेळत असताना तो बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे, ही घटने प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे . दिलकैश अन्सारी वय 1 वर्ष असे मृत्यू पावलेल्या चिमुळ्याचे नाव असून या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मृत्यू पावलेला चिमुकळा हा भिवंडीतील देव नगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता,घटनेच्या वेळी मृत चिमुकळ्याची आई रात्रीचे किचन मध्ये  जेवण तयार करीत होती व त्यांची इतर मुले घरात हॉल मध्ये बसून टीव्ही बघत  होती  त्यावेळी खेळता खेळता चिमुकळा बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला व त्यातच या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

मृत दिलकैश अन्सारी याचे 6 भावंड असून तो सर्वात लहान होता, या प्रकरणी मृतक ची आई शबाना अन्सारी (वय 29 वर्ष ) यांच्या तक्रारी वरून भोईवाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून  पोलिसांनी तपास सुरू केला आहे .  आता पोलीस  तपास अंती नेमकी घटना कशी घडली याचे सत्य समोर येणार आहे . तर दुसरीकडे लहान बालकांवर आई वडिलांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे हेच या घटनेवरून दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad