Type Here to Get Search Results !

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून लोणार सरोवराची पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराची माहिती जाणून घेतली.

 शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज वनकुटी व्ह्यू पॉईंट येथून लोणार सरोवराची पाहणी केली. यावेळी त्यांनी लोणार सरोवराची माहिती जाणून घेतली.



लोणार सरोवर हे जैवविविधतेचे भांडार आहे. या सरोवराचा विकास करताना एक निश्चित नियोजन तयार करावे, त्यानुसार आराखडा तयार करावा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असे मत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले.


याठिकाणी मंदिरांची संख्या अधिक असल्याने वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. येथील वनसंपदा धोक्यात येऊ नये,यासाठी मर्यादित प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करू शकतो का याची पडताळणी करावी,असे ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad