Type Here to Get Search Results !

मंगळवेढा तालुक्यात सलगर खु.येथे हटकर समाज जनजागृती मेळावा संपन्न.


मंगळवेढा तालुक्यात सलगर खु.येथे हटकर समाज जनजागृती मेळावा संपन्न

मंगळवेढा तालुक्यात सलगर खु.येथे हटकर समाज जनजागृती मेळावा संपन्न

हटकर समाजाचा जनजागृती मेळाव्याचे उद्घाटन युवा उद्योगपती मा.श्री.दादासाहेब व्हरगळ साहेब सदस्य धनगर आरक्षण क्रुती समिती महाराष्ट्र राज्य व श्री. प्रगतशिल बागायतदार तातोबा भगवान बंडगर गोणेवाडीकर यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सलगर गावचे मा.सरपंच जेष्ठ नेते मा.श्री.भारत पाटील साहेब उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर सर्व समाजातील नेते मंडळी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.जनजागृती मेळाव्यात कार्यक्रमाचे प्रस्ताविक युवा नेते सुरेश पाटील यांनी केले यावेळी मा.श्री.लक्ष्मण पाटील सरपंच कोणीकुणर, मा.श्री.तानाजी खोत नेते हटकर समाज संघटना,मा.श्री. सतीश करवर,मा.श्री.विनायक पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष,मा.श्री.लालासाहेब यजगर मा.श्री. संजय खुळे नुतन तालुका युवा अध्यक्ष मंगळवेढा,युवा नेते मा.श्री.दरेश्वर चौगुले अध्यक्ष चौगुले अँकडमी ,मा.श्री.उद्योगपती दादासाहेब व्हरगळ मा.श्री. कँप्टन भाऊसाहेब पाटील जत श्री.भिमराव भुसनर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शोभा सलगर मधील सर्व समाजातील तरुण मुलांनी आणली युवा पिढी एकत्र आल्याचा खुप आनंद झाला. समाजातील सर्व जेष्ठ मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते मंगळवेढा तालुका युवा अध्यक्ष पदी संजय ज्ञानोबा खुळे यांची निवड करण्यात आली. तर शाखा अध्यक्ष म्हणून युवा नेतृत्व महावीर डिगंबर पाटील तर उपाध्यक्ष पदी दामाजी देविदास पाटील यांची निवड करण्यात आली. यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हटकर समाजा मधील भविष्यातला युवा उद्योजक मा.श्री.सुरेश अरविंद पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies