Type Here to Get Search Results !

प्रहारच्या इशाऱ्यानंतर उंबरे व परिसरातील वीज पुरवठा सुरळीत  --अखेर वीज वितरणचे अधिकारी नरमले

प्रहारच्या इशाऱ्यानंतर उंबरे व परिसरातील वीज पुरवठा सुरळीत 
--अखेर वीज वितरणचे अधिकारी नरमले

दि.30.12.2017 उंबरे(पागे) ता पंढरपुर येथील व परिसरातील गावांमधील विद्युत महावितरणने मागील चार ते पाच  दिवसापासून शेतीसाठीचा वीज पुरवठा खंडित करून केवळ अर्धा तास वीज पुरवठा केला जात होता.थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांचा शेतीच्या विद्युत मोटारींचा वीज पुरवठा विद्युत वितरणने कोणतीही पूर्व कल्पना न देता खंडित केला होता.खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी येथील परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी करकंब येथील टेंभुर्णी-पंढरपूर मार्गावर जळोली चौक येथे आज सकाळी १० वाजल्या पासून दुपारी वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत रस्ता रोको करण्यात आला होता.
   यावेळी प्रहार संघटनेचे पश्चिम विभाग प्रमुख अतुल खुपसे यांनी वीज जोडणी पूर्ववत करुन जोपर्यंत सुरळीत वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्याचा पवित्रा घेतला जर वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर करकंब येथील विद्युत वितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना कोंडून ठेऊ असा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंढरपुर वीज वितरणचे अभियंता संतोष सोनवणे हे चर्चेसाठी पुढे आले.त्यानंतर त्यांनी आपण वीज बिल भरल्याच्या पावत्या दाखवल्यास तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करणार असल्याचे सांगितले उपस्थित शेतकऱ्यांनी आपण भरलेल्या बिलाच्या पावत्या दाखवल्या असता त्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे फोनवरून आदेश दिले व ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भरावे असे आव्हान केले.यावेळी करकंब विद्युत वितरणचे अभियंता महेश बेसुळके,करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि दीपक पाटील,मंडल अधिकारी औसेकर,तलाठी प्रशांत शिंदे आदिना निवेदन देण्यात आले.
     यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश पाटील,ता.अध्यक्ष दत्ता व्यवहारे,तालुका युवक अध्यक्ष नानासाहेब इंगळे,गणेश लामकाने,शहाजी मुळे, प्रेम चव्हाण,बापुराव  मोहिते, निलेश तळेकर,विठ्ठल कानगुडे,तुकाराम कानगुडे,नवनाथ कानगुडे,गणेश ढोबळे,आप्पा कचरे,कृष्णा शिंदे,महेश इंगळे,अजित इंगळे,संतोष कानगुडे,महेश मुळे, जयवंत रजपूत,अजय ढोबळे, जिवराज मोरे,दत्ता कानगुडे, विजय मुजमुले,शरद मोरे,बिभीषण शिरसठ,गणेश सलगर,रमेश इंगळे,राजेश ढोबळे, विनायक चव्हाण,रामदास कोठवळे,महादेव चव्हाण,किरण कचरे,दिपक ढोबळे,अण्णा मुजमुले,शिवाजी लोंढे,हनुमंत सलगर,विठ्ठल शिरसट आदिसह परिसरातील शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad