Type Here to Get Search Results !

चैनसाखळी चोराला टिळकनगर पोलीसांनी ठोकल्या बेड्या.



 प्रतिनिधी(भानुदास गायकवाड)

दिनांक ६ रोजी टिळकनगर हद्दीतील एक ३५ वर्ष्याच्या महिला दुपारी३ च्या सुमारास पत्रिपूलाशेजारील असलेल्या होमीबाबटेकडीवर होमबाबा टेकडीवर दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी पायी जात असताना त्या निर्जन ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपी अमीर मंगल शेख याने त्या ठिकाणी येऊन त्याने त्या महिलेचा विनयभंग करुन तिच्या गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून गेला.

      गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील संवेदनशीलता व गांभीर्य लक्ष्यात घेऊन मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये विविधपथके तयार करुन गुन्ह्याचा तपास सुरू केला व अहोरात्र मेहनत करून व गोपनीयमाहितीच्या आधारे आरोपी अमीर मंगल शेख वय वर्ष २९ रा. हनुमाननगर होमीबाबा टेकडी , संतोष नगर , पत्रिपुलमागे कल्याण (पूर्व ) यास वांगणी बदलापुर येथून ताब्यात घेऊन नमुद गुन्हयात अटक केली असून पुढील टपस चालु सुरु आहे 

       वरील गुन्हा उघडीस आणावयाच्या कारवाईत मा. श्री दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण , मा. श्री सचिन गुंजाळ , पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण , मा . श्री . सुनील कुराडे, सह पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग , मा. श्री. कल्याणजी घेटे , सह पोलीस आयुक्त कल्याण विभाग, श्री . उमेश गीते , वरिष्ठ पोलीस निरीक्षक टिळकनगर पोलीस ठाणे यांचा मार्गदर्शनाखाली सपोनी शिंदे, पोउपनीरी शेख , सोनवणे, पोहवा/ कांबळे, पगारे, पोशि/ राठोड , राजपुत , सपकाळे यांनी अत्यंत मेहनतघेऊन आरोपीला अटक करुन गुन्हा ऊघडीस आणला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies