Type Here to Get Search Results !

JSW फाऊंडेशन मुंबई संयुक्त विद्यमानाने ग्रा. प. कौलाळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर



जव्हार :-सोमनाथ टोकरे.


दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी जव्हार तालुक्यातील बहुचर्चित असलेली ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे शिव मंदिर येथे जव्हार पंचायत समिती माजी सभापती/ विद्यमान सदस्य चंद्रकांत रंधा. कौलाळे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच वैशाली धोडी यांच्या हस्ते आरोग्य शिबिर चे फोटोला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

    JSW फाऊंडेशन मुंबई आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे मधील नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी जव्हार पंचायत समिती माजी सभापती/ विद्यमान सदस्य चंद्रकांत रंधा, लोकनियुक्त सरपंच वैशाली धोडी, तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी नागरिकांना आव्हान केले. आदिवासी ग्रामीण भागामध्ये काही गरीब कुटुंबे यांना मोठे आजारावरती ऑपरेशन औषध उपचार परवडत नाही. स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिर च्या माध्यमातून गोरगरीब जनतेने त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. यामध्ये मोफत जनरल तपासणी, इतर सर्व आजारावर औषधे, बीपी, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी, व औषधे, लहान मुलांची तपासणी व औषधे, मोठ्या माणसांची तपासणी व औषधे, सर्व रुग्णांनी या आरोग्य शिबिर मध्ये ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. JSW फाऊंडेशन मुंबई आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल मुंबई त्यांची संपूर्ण टीम माजी सभापती चंद्रकांत रंधा, सरपंच वैशाली धोडी, उपसरपंच शंकर मेढा, सदस्य. प्रदीप निकुळे, सदस्य वंदना ठोबरे, माजी उपसरपंच सुभाष मूरथडे, उप तंटामुक्त अध्यक्ष ईश्वर बांगड, योगेश कचरे, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, महिला मंडळ, इत्यादी उपस्थित होते.

गेली अनेक पासून सामाजिक काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधींनी विकास कामे केली. आणि ग्रुप कौलाळे मधील नागरिकांनी आरोग्य शिबिर चा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे.

    . माजी सभापती/सदस्य चंद्रकांत रंधा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad