Type Here to Get Search Results !

आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे नव्यानेच सुरू झालेल्या आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.खोडाळा परीसरातील शेकडो नागरिकांनी या शिबाराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली.

या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खोडाळा गावचे उपसरपंच उमेश येलमामे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की या हॉस्पिटल मुळे सर्व सामान्य माणसाला दिलासा मिळाला असुन नाशिक,ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला असुन रुग्णांना तातडीने उपचार मिळेल, शिवाय आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करुन गोरगरीब जनतेसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या मुळे आरोग्यम हॉस्पिटल च्या सर्व डॉक्टर्स चे अभिनंदन करतो असे श्री वाघ यांनी कौतुक केले.

या शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या असून, नाशिक, घोटी येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांना तपासले आहे.खोडाळा परीसरातील शेकडो रुग्णांनी तपासणी करून घेतली.

या शिबिराचे आयोजन डॉ.योगेश मुकणे, डॉ शिवाजी घोरपडे, डॉ सागर मुकणे, डॉ राजेश वाघ, डॉ.राजेश पाटील व आरोग्यम हॉस्पिटल प्रशासनाने केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad