Type Here to Get Search Results !

कसारा रेल्वे स्थानकात आरपीएफ जवानाचा ट्रेनमधून उतरताना तोल जावून दुर्देवी मृत्यू



       कसारा रेल्वे स्थानकात दुःखद घटना घडली असून एका आरपीएफ जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवाशांच्या तक्रारी ऐकण्यासाठी डब्यात गेलेल्या आरपीएफ जवानाचा ट्रेनमधून उतरताना तोल गेल्याने खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी ६.४५ वाजताची घटना असून ही घटना रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील रहिवासी असलेले आरपीएफ जवान दिलीप सोनवणे (५३) शनिवारी रात्री कसारा येथे रात्री ड्युटीवर होते. सकाळी सातच्या सुमारास एलटीटी-कानपूर एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी त्यांना मदतीसाठी हाक मारली. तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वेत चढले. थोड्या वेळात गाडी सुरू झाली आणि त्यानंतर चालत्या ट्रेनमधून आरपीएफ जवान दिलीप सोनवणे यांनी उतरण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा करुण अंत झाला यांच्या पश्चात् पत्नी, २मुले व १ मुलगी असा त्यांच परिवार आहे .


प्रतिनिधि / भानुदास गायकवाड़

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad