Type Here to Get Search Results !

मानसी हाईट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न



डोंबिवलीः डोंबिवली शहरातील मानसी हाईट्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या वतीने ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात आले होते.




सकाळी ध्वजारोहण सोसायटीतील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी सैनिक श्री. मारुती सुतार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. तर सामुहिक राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन कु. श्रेया खिलारी व मनस्वी मोरे यांनी वाचन केले.त्यानंतर अतिशय बहारदार देशभक्तीपर गीतगायन व आकर्षक वेशभुषा करत नागरीकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रंगत आणली.




शेवटी अक्षरा माने,सिद्धांत शेळके, सादिया खान, सुबोध भुवड, रावी मालकर, तेजस आंगणे, प्रणित देवाडिगा , जीविका पावडे, आराध्य बुरीवार, सिद्धी जगताप , तन्मय कुलकर्णी , यश वैद्य, अन्वी सकपाळ , दुर्वांश राजपूत, अचिंत्य पुजारी,  साहीशा लिंब, अद्या पेडणेकर, प्रणित यांनी सामुदायिक वंदे मातरम गायले. व अल्प उपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


प्रतिनिधी/भानुदास गायकवाड़

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad