Type Here to Get Search Results !

सांगोला | अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमास पोलिसांनी घेतले ताब्यात १७ हजार ६९० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.



अवैधरीत्या देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमास पोलिसांनी घेतले ताब्यात १७ हजार ६९० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.


अवैधरीत्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून १७ हजार ६९० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पो. ना. सुनील मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शामराव खरात रा. नाझरा ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




याबाबत अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस नाईक सुनील मोरे, स. पो. फौ. तोडले, पो. कॉ. मिसाळ असे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना सांगोला ते मिरज रोडवरील नाझरा मठ येथील टोकनाक्याजवळ हॉटेल राजहंसच्या बाजूस एक इसम आडोशाला चोरुन देशी-विदेशी दारुची विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.




बातमीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून 'अवैधरीत्या देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या हणमंत शामराव खरात रा. नाझरा ता. सांगोला यास ताब्यात घेतले. पोलिसांनी ता. सांगोला यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून १७ हजार ६९० रुपयांचा देशी विदेशी दारूचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी पो. ना. सुनील मोरे यांनी हणमंत शामराव खरात रा. नाझरा ता. सांगोला याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad