त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाडमराठी राजभाषा गौरव दिन साजरा
तळोदा:- ईश्वर मराठे
विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्था तळोदा संचलित त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथे 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला प्रमुख वक्ते म्हणून कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय येथील ज्योत्सना पिंपरे यांना आमंत्रित करण्यात आले होते
प्रमुख वक्ते यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा काल आज व उद्या कसा मराठीचा विकास होत गेला याबद्दल माहिती देऊन मराठी भाषेच्या गौरव केला सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अनन्या तांबोळी उपस्थित होते मराठी भाषेला गौरवान्वित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आरजू पिंजारी होते त्यांनी मराठी भाषेच्या इतिहास सांगितला.
मराठी विभाग प्रमुख प्रा. अश्विनी माळी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यावर विचार मांडले आणि कवी कुसुमाग्रज यांचे लेखन कार्य व्यक्त केले तसेच चेतना माळी यांनी मराठी भाषेच्या शृंगार यावर कवितेचे गायन केले सदर कार्यक्रमात महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अवंतिका पाडवी हिने सूत्रसंचालन केले तर प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे यांनी आभार मानले.