Type Here to Get Search Results !

पटवर्धन कुरोली प्रशालेमध्ये 1998 साली उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन साजरा केला गेट-टुगेदर



पटवर्धन कुरोली प्रशालेमध्ये 1998 साली उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एकत्र येऊन साजरा केला गेट-टुगेदर 


या कार्यक्रमांमध्ये सासरी गेलेल्या मुलींनीही हजेरी लावली तब्बल 25 वर्षानंतर एकत्र येऊन पटवर्धन कुरोली प्रशालेची शोभा वाढवली


 सकाळी 11 ते 5 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात 11 वाजता शाळेची बेल वाजवून शाळेत सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रवेश केला


 तसेच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या प्रशालेतील सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले 



या विद्यार्थ्यांनी दुपारी जेवणाच्या सुट्टीत एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला 


या कार्यक्रमात उपस्थित वेगवेगळ्या पदावर असणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनीही हजेरी लावली 


या कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 


या कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली


प्रतिनिधी ज्ञानेश्वर उपासे पंढरपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News