Type Here to Get Search Results !

हिमायतनगर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची कार्यकारिणी जाहीर.



हिमायतनगर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची कार्यकारिणी जाहीर.

तालुका अध्यक्षपदी गजानन चायल तर सचिव पदी नागेश शिंदे यांची निवड


हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/- येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात दिनांक 14 जानेवारी रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाची एक बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीच्या सुरुवातीला शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे व संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय मोगडपल्ले, कार्याध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ले यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले




त्यानंतर हिमायतनगर येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाची तालुका कार्यकारणीची निवड करण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक साहेबराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली त्या बैठकीत सर्व समाज बांधवांच्या सहमतीने व एक मताने हिमायतनगर येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मागील पाच वर्षापासून कार्य करणारे तरुण तडफदार पूर्वीचेच अध्यक्ष गजानन चायल यांची पुन्हा एकदा सर्वानुमते फेरनिवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्याचबरोबर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवा तरुण धडाडीचे कार्यकर्ते नागेश शिंदे यांची तालुका सचिव पदी निवड करून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष संजय मोगडपल्ले,जिल्हा कार्यअध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ले , प्रसिध्दी प्रमुख दत्ता चापलकर ,शहर सचिव बालाजी चिनुरकर, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे,पत्रकार परमेश्वर शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका उपाध्यक्ष पप्पू सोळंके, युवा तालुकाध्यक्ष राजू सुरजवाड ,चंद्रकांत कळसे,गणेश वाघमबरे, सुभाष राचटकर, रवी जोनापल्ले,रमेश लिंगमपल्ले, लक्ष्मण मोतेवार, अवधूत गायकवाड,श्रीकांत घुंगरे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, बालाजी लिंगमपल्ले,अंकुश शिंदे, परमेश्वर सुरजवाड,अनिल सूर्यवंशी ,अरविंद पवार,विशाल,अमोल शिंदे सह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad