Type Here to Get Search Results !

जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीची चौकशी करा-श्याम राजपूत यांची मागणी



जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीची चौकशी करा-श्याम राजपूत यांची मागणी


 धुळ्याच्या जात पडताळणी समितीच्या बेकायदेशीर कार्यपद्धतीची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तळोदा तालुका भटके विमुक्त हक्क परिषेदेचे तालुकाध्यक्ष श्याम राजपूत यांनी मुख्यमंत्री तसेच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 


      सदर निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात एप्रिल २०२० पासून मनमानी कारभार सुरू आहे. पदाचा गैरवापर करत


दबावतंत्राने असंवैधानिक कार्यपद्धतीने काम केले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. कायद्याच्या कक्षेत कोणत्याही जाती जमाती घटकावर अन्याय होऊ नये हे अभिप्रेत असतांना संबंधित अधिकारी सामाजिक न्यायतत्त्वाची पायमल्ली करून अन्याय करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 


कार्यपद्धतीबद्दल वेळोवेळी विविध संघटनांनी शासन दरबारी कैफियत मांडलेली आहे. दरम्यान, या संदर्भात आ. किशोर पाटील यांनी बेकायदेशीर कार्यपद्धतीबद्दल विधिमंडळ अधिवेशनात सामाजिक न्याय खात्याच्या प्रश्नावर भूमिका मांडून शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. मात्र आजतागायत यावर कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, धुळे येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी हे समितीत कार्यरत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे याबाबत चौकशी करुन कारवाई व्हावी, अशी मागणी तळोदा तालुका भटके विमुक्त हक्क परिषदेचे तालुकाध्यक्ष श्याम राजपूत यांनी केली असून याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies