Type Here to Get Search Results !

कर्तव्यदक्ष डिवाएसपी शफक्त आमना यांची हिमायतनगर येथील मटका बुकिंवर धाड..आरोपी सह मुद्देमाल जप्त.



कर्तव्यदक्ष डिवाएसपी शफक्त आमना यांची हिमायतनगर येथील मटका बुकिंवर धाड..आरोपी सह मुद्देमाल जप्त.

कार्यवाहीने मटका माफीयांचे धाबे दणाणले…


हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/- शहरातील चौपाटी परिसरात राजरोसपणे मटका बुकी तेजीत सुरू होती त्यावर भोकर येथील कर्तव्यदक्ष डिवायएसपी शफक्त आमना यांच्या पथकाने धाड टाकून मुद्देमाला सह आरोपींना जेरबंद केले आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे


याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहर हे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून नावा रुपाला येत आहे त्यातच चौपाटी परिसरात तर दिवसरात्र अवैध धंदे सुरू असतात त्यावर हिमायतनगर येथील पोलीस प्रशासनाची जरब नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहे त्यामुळे भोकर येथे नव्याने आलेल्या डीवायएसपी यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंदे करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे वृत्त समजले त्यामुळे मागील बऱ्याच दिवसापासून शहरात बंद झालेला मटका काही ठिकाणी छुप्या मार्गाने सुरू होता ह्या घटनेवर पोलिसांनी पाळत ठेवून आज दिनांक एक डिसेंबर रोजी डीवायएसपी यांच्या पथकाने चौपाटी परिसरातील मटका बुकिंवर धाड टाकून तेथील मुद्देमालासह आरोपींना जेरबंद केले आहे त्यामुळे हिमायतनगर शहरात अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले असल्याचे पाहायला मिळाले वृत्त प्रकाशित करेपर्यंत हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad