Type Here to Get Search Results !

धक्कादायक ! प्रसिध्द ‘टिकटॉक’ स्टार संतोष मुंडे चा करंट लागून दुर्दैवी मृत्यू



धक्कादायक ! प्रसिध्द ‘टिकटॉक’ स्टार संतोष मुंडे चा करंट लागून दुर्दैवी मृत्यू 


बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील टिक टॉक वरून प्रसिद्धीस आलेला संतोष मुंडे व त्याच्या सोबतच्या आणखी एका तरुणाचा विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजले. 




एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.




शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी.


एकेकाळी,  tik toktok वर कॉमेडी करून धुमाकुळ घालून सर्वांचा मनावर राज्य करणारा tik toktok स्टार 
बीड जिल्ह्यातील भोगलेवाडी येथील संतोष भाऊ मुंडे यांचा विजेच्या धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला ही बातमी अतिशय जीवाला लागणारी आहे खूप धक्का बसणारी आहे संतोष भाऊ ने केलेले विनोदी विडिओ कधी ही विसरू शकणार नाही मिस यु संतोष भाऊ मुंडे विनम्र आदरांजली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad