Type Here to Get Search Results !

तुषार पांडुरंग ठाकरे यांनी 14 वर्षे वयोगटात जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत प्रथम क्रमांक



क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिम्नॅस्टिक असोसिएशन नंदुरबार वतीने आयोजित जिल्हास्तर शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2022 - 23 या स्पर्धेत विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित माध्यमिक विद्यालय आमलाड चा विद्यार्थी तुषार पांडुरंग ठाकरे यांनी 14 वर्षे वयोगटातील स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला असून त्याची भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथे दि 13 रोजी होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तुषार ठाकरेला बिरसा मुंडा स्पोर्ट्स अकॅडमी प्रशिक्षक तथा नंदुरबार जिल्हा जित कुने डो असोसिएशन अध्यक्ष डिगंबर नाईक व राजेंद्र पाडवी याचे मार्गदर्शन लाभले आहे व जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत पहिल्या क्रमांक मिळवल्याबद्दल त्याच्या गावात व शाळेत कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad