Type Here to Get Search Results !

रांझणी येथे गुरांच्या लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद



रांझणी येथे गुरांच्या लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


तळोदा :- येथून जवळच असलेल्या रांझणी तालुका तळोदा येथे 29 नोव्हेंबर रोजी शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना प्रतापूर श्रेणी 1 व कृषी महाविद्यालय दोंडाईचा (कृषीदूत ) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरांसाठी लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या गुरांचे लसीकरण करून घेतले. प्रारंभी लसीकरण शिबिराचे रांझणीचे लोकनियुक्त सरपंच अजय ठाकरे यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बहुसंख्य शेतकरी वर्गाने आपली गुरे, दुधाळ जनावरे शिबिरात आणून घटसर्प, फऱ्या आधी विषाणूंचे लसीकरण करून घेतले. शिबिरामध्ये एकूण 320 जनावरांना लसीकरण करण्यात आले.



लसीकरण कार्यक्रमासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नवले पशुसंवर्धन पर्यवेक्षक महेंद्र जगदाळे, उच्चारक आर. ऐन.सोनवणे, मदतनीस दीपक वसावे, यांनी विशेष सहकार्य केले. शिबिरास गावातील उपसरपंच शरद मराठे, व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. लसीकरण शिबिर आयोजनासाठी दोंडाईचा महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी राजपूत, कार्यक्रम समन्वयक प्रा रविंद्र देशमुख, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. पराग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत रुपेश पाटील, कृषकांत पाटील, कुणाल पाटील गिरीश पाटील शुभम उशीर यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies