Type Here to Get Search Results !

भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखे तर्फे शहिदांना अभिवादन करून 'संविधान दिन'साजरा.



भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखे तर्फे शहिदांना अभिवादन करून 'संविधान दिन'साजरा.


हिमायतनगर ता. प्रतिनिधी एम. यू.हनवते

हिमायतनगर दि.26/11/2022 वार शनिवार रोजी नालंदा बुद्धविहार येथील सांस्कृतिक सभागृहात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कार्यकारिणीच्या वतीने सायंकाळी ठिक ७:वाजता 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहून संविधान दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रसंगी महामानवांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिका प्रतिकृतीचे कार्यकारिणीच्या वतीने पूजन करण्यात आले.त्यानंतर तालुका अध्यक्ष आयु. प्रताप लोकडे सर यांनी उपस्थित बौद्धबांधवांना त्रिशरण पंचशील दिले.



उपस्थित कनिष्क बाबासाहेब मुनेश्वर या बालकाने संविधान उद्देशिकेचे मोठ्याने वाचन केले.त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतआयु. शिवाजी कदम सर यांनी संविधानाच्या निर्मिती व कार्यपद्धती यावरती सखोल प्रकाश टाकला.तसेच विद्यार्थिनी कु. अभिलाषा राजीव हनवते, आर्यन म्हैसेकर या बालकांनी आपली संविधानावर मनोगत व्यक्त केली.त्याचबरोबर तालुका सरचिटणीस आयु.सुरेश गडपाळे सर यांनी उपस्थितांना कायद्याचे महत्व पटवून दिले.आयु गोविंद चांदू कांबळे, मारोती पोचीराम बनसोडे यांनी आपल्या वाणीतून गीते सादर केली.या कार्यक्रमाच्या शेवटी एम यु.हनवते सर यांच्या आभार प्रदर्शना नंतर शहिदांना आदरांजली वाहून या कार्यक्रमाची सांगता करण्यात अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad