Type Here to Get Search Results !

विशेष पथकाची अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या वर कार्यवाही.




विशेष पथकाची अवैधरित्या दारू बाळगून विक्री करणाऱ्या वर कार्यवाही.
   
कुशल भगत अकोला 

आज दि.2/19/22रोजी पेट्रोलिंग दरम्यान खात्रिलायक खबर मिळाली कि टाऊन शाळेच्या कंपाउंड जवळ एक इसम त्याच्या कबज्यात देशी दारू बाळगून आहे. अश्या खात्री लायक खबर वर सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता तेथे विनोद आकुसिंग ठाकूर वय 48 रा. जयरामसिंग प्लॉट जुने शहर ,अकोला हा मिळून आला. त्याच्या ताब्यात देशी दारू चे 129 नग असा एकूण 9030 रु.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वये पो. स्टे. जुने शहर येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे..

पेट्रोलिंग दरम्यान खात्रिलायक खबर मिळाली कि महाकाली नगर, मोठी उमरी येथील माऊली किराणा बाजूला एक इसम त्याच्या कबज्यात देशी दारू बाळगून आहे. अश्या खात्री लायक खबर वर सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता तेथे गोपाल जगन्नाथ मदनकर वय 39 रा. महाकाली नगर, मोठी उमरी ,अकोला हा मिळून आला. त्याच्या ताब्यात देशी दारू चे लहान मोठे 33 नग असा एकूण 1820रु.चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध महा. दारूबंदी कायदा कलम 65 ई कायदयाचे अन्वये पो. स्टे. सिव्हिल लाईन येथे गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे..

सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख श्री विलास पाटील साहेब यांनी व त्यांचे पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad